चंद्रपुर: एचएमटी तांदळासह तांदळाच्या 9 वाणांचं संशोधन करणाऱ्या चंद्रपुर दादाजी खोब्रागडे यांचं निधन झालं आहे. खोब्रागडे यांनी कृषीभुषण पुरस्काराने सन्मानित केलं आहे. दादाजी खोब्रागडे यांनी एचएमटी तांदळासह तांदळाच्या नऊ वाणाचं संशोधन केल होतं.
गेल्या काही दिवसांपासुन ते आजारी होते. उद्या चंद्रपुर जिल्हयातल्या नांदेड या मुळगावी त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. नागभीड तालुक्यातल्या नांदेड गावचे रहिवासी असलेले दादाजी सामान्य शेतकरी असुन त्यांनी संशोधीत केलेले वाणाचे तांदुळ देशभरात वापरले जातात. तांदळावर वेगवेगळ्या पद्धतीने संशोधव करून तब्बल 107 पुरस्कार दादाजींनी मिळवले आहेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours