सपादीका...सुनिता परदेशी
नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या कारभारामुळे, सामान्य जनता व इथला शेतकरी प्रचंड त्रासला गेला असतांना, ओबीसी समाजाची जनगणना,स्वतंत्र मंत्रालय,स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तत्काळ लागू करा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, बेरोजगारांना रोजगार, दोन्ही जिल्ह्यांचा रखडलेला विकास या विषयावर सरकार गंभीर दिसत नसल्याने मी खासदारकीचा राजीनामा दिला.त्या अनुषंगाने या लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली,दरम्यान मी कांग्रेस पक्षात प्रवेश घेतला.या पोटनिवडणुकीच उमेदवार निवडीपासून तर दोन्ही पक्षांमधील सर्व निर्णय, दोन्ही पक्षश्रेष्टीचा मार्गदर्शनाखाली, दोन्ही जिल्ह्यांतिल नेंत्याना विश्र्वासात घेऊनच माझे मोठे बंधू प्रफुल्ल पटेल आणि मी घेतलेले आहे, आमच्या मधील वैचारिक मतभेद पुर्णपणे मिटवून, मनामध्ये कोणताच पुर्वाग्रह न बाळगता दोन्ही पक्ष समविचारी असल्याने एकनिष्ठ झालों.आमच्या दोघांमध्ये संबंध अतिशय प्रामाणिक व कौटुंबिक जिव्हाळ्याचे झाल्याने हे विरोधकांना पचनी न पडण्यासारखे झाले होते, तेव्हा पासूनच, नागपूर वरून यंत्रणा हालवून आमच्या सबंधांमध्ये वितुष्ट आणण्याचे सात्यत्याने प्रयत्न सुरू होते.भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत माझे मोठे बंधू प्रफुल्ल भाई यांच्या संघटन कौशल्य व कुशल नेतृत्वावर मी तिळमात्र शंका केलेली नाही.पुर्वीपासूनच ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यात असल्यामुळे कधीच मी या जागेसाठी आग्रह धरला नाही.माझ्या पक्षश्रेष्टि आणि प्रफुल्ल भाई यांनी मला जे आदेश दिलेत,त्याचा आम्ही पुर्णपणे तन, मनांनी पालण केला आहे.या पोटनिवडणुकीच्या प्रचारांच्या रनसंग्रामात माझ्या एवढेच, किंबहुना माझ्यापेक्षा ही जास्त प्रचार धुराळा माझे मोठे बंधू प्रफुल्ल भाई यांनी त्यांच्या कडे कामांचा प्रचंड मोठा तान असताना देखील अतिशय सुरळीत पार पाडला.दोन्हीं पक्षातील कार्यकर्त्यांना कधीच त्यांची उनिव भासू दिली नाही तर उलट भंडारा गोंदिया जिल्हातूनच भाजपा मुक्त भारत करण्याचा संकल्प आम्हा सर्वांना दिला.या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांपासून ते केंद्रीय मंत्र्यांनी माझ्या विरोधात खालच्या पातळीवर जावून प्रचार केला,त्यात खचुन न जाण्याचा धाडस प्रफुल्ल पटेल यांनीच मला दिला.

 राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष समविचारी असल्याने आदिच युतीचे संकेत महाराष्ट्रात दोन्ही पक्षातिल पक्षश्रेष्टीने दिल्याने विरोधकात कुचबुच माजली आहे, म्हणुन या दोन्ही पक्षात कशी फुट पाडुन यांना एकटे पाडण्याचे षडयंत्र यादीपासूनच विरोधकांन कडुन सुरू आहे.या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस/ कांग्रेस/रिपाइं/पिरीपा आणि मित्र पक्षाचे नेते सर्व कार्यर्कत्यांच्या परिश्रमामुळेच आघाडीचे उमेदवार श्री. मधूकर कुकडे यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झालेला आहे.म्हणुन आपला विजय हा भाजपा ला पचनी पडण्या सारखं नाही,कारण या निवडणुकीत भाजप कडून मोठ्या प्रमाणात पैसांचा व साम दाम दंड भेद व सत्तेचा गैरवापर करून देखील भाजपा ला विजय मिळवता आला नाही, त्यामुळे पुढच्या सार्वत्रिक निवडणूक नजरे समोर ठेवून आम्हा दोघां भावात फुट कशी पाडता येईल हे भाजपवाल्यांचे रोजचे नित्यनियमाचे कामच झालेले आहे.या निवडणुकीत प्रफुल्ल भाई पटेल त्यांचा पक्षातिल सर्व नेते सर्व कार्यकर्ते ,कांग्रेस पक्षाचे, रिपाइं पिरीपा चे सर्व नेते आणि कार्यकर्ते यांनी घेतलेली प्रचंड मेहनत त्यामुळेच हा विजय निश्चित झाला.त्यामुळे हा कुणी एकाचा विजय नसुन,हा भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सर्व सामान्यांच्या विजय आहे.काही वर्तमानपत्रातिल प्रतिनिधींनी माझी मुलाखत घेतली असेल,त्यात हा विजय माझ्या एकट्यामुळेच झाले असं मी कधीच बोललो नाही, माझ्या शब्दांचा विपर्याय करून तोडून मोडून काही  वर्तमान पत्रामध्ये विरोधकांनी आपल्या सोयीनुसार बातम्या प्रकाशित करून आमच्या दोघा भावामधील कौटुबिंक सबंधांमध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न होत आहे.यावर जनतेनी व दोन्ही पक्षातिल कार्यकर्त्यांनी गैरसमज करवून घेऊ नये व लक्ष सुद्धा घालू नये.या संदर्भात शेवटी फक्त मी एकच बोलेन की, पुढील सार्वत्रिक निवडणूक नजरे समोर ठेवून असं गैरसमज आमच्या मध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न कराल तर खबरदार ! तुम्ही कधीच आपल्या मनसुबात सफल होणार नाही.शेवटी माझे मोठे बंधू प्रफुल्ल भाई आणि नाना पटोले यांचे आता आप्तेष्टी संबंध कधीच दुरावले जाणार नाही.याची आम्ही जातीने खबरदारी घेत आहोत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours