मुंबई, 30 जून : मुंबईतील भांडुपजवळ ईस्टर्न एक्सप्रेसवर ट्रक आणि कारचा अपघात झाला. ज्यात २ जण दगावली.आज सकाळी सात वाजायच्या सुमारास मुंबईत अपघात झाला. या अपघातात कारमधील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर तर तीन जण जखमी झाले.जखमींना मुलुंड येथील खासगी रुग्णलयात उपचारासाठी भरती करण्यात आलं आहे.
सकाळी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर भांडुप पम्पिंगच्या पुलावर हा अपघात झाला.एक कंटेनर मुंबईच्या दिशेने जात होता.त्याच वेळी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने होंडा सिटी ही कार जात होती. कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही कार बाजूच्या लेननी जाणाऱ्या कंटेनरवर जाऊन आदळली. यात कारमधल्या 5 जणांपैकी 2 जण मृत्यू पावले तर 3 जण जखमी झाले. यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours