मुंबई, 30 जून : गायीच्या दुधाला ५ रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालं नाही तर तर १६ जुलैपासून मुंबईचा दूधपुरवठा तोडणार असा इशारा  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिलाय. १५ जुलैपर्यंत त्यांनी सरकारला मुदत दिली आहे.  नाहीतर १६ जुलैपासून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर  नाशिक या जिल्ह्यांतून एक लिटरही दूध मुंबईकडे जाणार नाही अशी व्यवस्था केली जाईल, असं शेट्टी म्हणालेत. त्यातून जी परिस्थिती उद्भवेल त्यास सरकार जबाबदार असेल  पण यापुढे शेतकऱ्याची लूट होऊ देणार नाही , असा इशारा शेट्टी म्हणालेत.

पुण्यात काल स्वाभिमानीचा कैफियत मोर्चा होता, त्यावेळेस त्यांनी हा इशारा दिलाय.  १५०० कोटी रुपयांची उसाची थकीत एफआरपी येणे बाकी आहे. व्याजाची रक्कम शेतकऱ्यांनी का द्यावी? एफआरपीची रक्कम देण्याची जबाबदारी सरकारची आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कारखान्यांकडे तब्बल ६० कोटी थकीत आहे. ३० जुलैपर्यंत थकीत रक्कम देण्यात यावी अन्यथा मंत्र्यांच्या घरावर जप्ती आणावी लागेल.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours