जिल्हा महिला कॉंग्रेस कमिटीतर्फे नगर परिषदेसमोर आंदोलन

रिपोर्टर महाराष्ट्र जाफरी

यवतमाळ : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा यवतमाळचे आमदार मदन येरावार यांनी यवतमाळच्या नागरिकांना आजवर पाण्यासाठी केवळ तारखा दिल्या. पावसाळा येऊन ठेपलाय मात्र पाणी मिळालेले नाही. या विरोधात यवतमाळ जिल्हा महिला कॉंग्रेस कमिटीतर्फे यवतमाळ नगर परिषदेसमोर आंदोलन केले. 

महिला जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा माधुरीताई अराठे, शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यवतमाळ शहरासह जिल्ह्यात पाण्याची भिषण टंचाई व रस्त्यांची दुर्दृशा झाली आहे. दोन वर्षांपासून शहरातील छोट्या मोठ्या रस्त्यांवर खोदकाम चालु आहे. हि कामे करतांना प्रशासन व ठेकेदार यांच्यामध्ये समन्वय नसल्याने कोणत्या रस्त्याचे खोदकाम किती वेळा करायचे व ते करतांना जनतेची गैरसोय होऊ नये म्हणुन पर्यायी व्यवस्था करण्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात रोज लहान मोठे अपघात होत आहेत. 

धुळ व प्रदुषणामुळे व्यापारीवर्ग तसेच सर्वसामान्य यवतमाळकर त्रस्त झाले आहेत. याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री व प्रशासनाचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पालकमंत्री मदन येरावार यांच्या या आंदोलनात निषेध करण्यात आला. गेल्या चार महिन्यांपासून शहरात पाणी टंचाईने भिषण पाणी टंचाईने ग्रासले आहे. यवतमाळकरांना आजवर कधीच पाण्याची एवढी टंचाई जाणवली नाही. मात्र यावर्षी प्रशासनाचा नियोजनाचा अभाव व लोकप्रतिनिधींचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष यामुळे जनतेचे प्रचंड हाल झाले. शेवटचे नळ कधी आले होते हे देखिल यवतमाळकरांना आठवत नाही. 

लोकप्रतिनिधी केवळ श्रेय लाटण्याचा प्रयत्न करून खोट्या आश्वासनांच्या माध्यमातून वेळ मारून नेत आहेत. पाण्यासाठी मोर्चे व आंदोलन करणा-यांवर दरोडे, दंगल करणे असे गंभीर गुन्हे दाखल करून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्या जात असल्याचा आरोप या आंदोलनातून करण्यात आला. या सर्व समस्यांचा निपटारा ताबडतोब करून जनतेला या त्रासातून मुक्त करावे अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली. 
या आंदोलनासाठी पारस वसंतराव अराठे, ललीत जैन, मनिष बोनीकीले, प्रशांत शेटे, सागर सुर्यवंशी, शुभम बावनकर, निलेश बावनकर, शुभम जैस्वाल, ताराबाई नारायणे, कविता नागपुरे, विजया कासटकर, दिपा पाठे, कविता हेमंत कांबळे,वर्षा खत्री, सारीका बोरकर, शिला नागोसे यांनी पुढाकार घेतला. या आंदोलनात शेकडो महिलासह यवतमाळकरांनी सहभाग नोंदविला.



Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours