मुंबई : 2019 च्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर असताना भाजप आणि शिवसेनेत धुसफूस सुरूच आहे. यावर तोडगा काढण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला 'मातोश्री'वर पोहोचले.
मातोश्रीवर पोहोचल्यानंतर पहिल्या टप्प्यात उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यात एक बैठक पार पडली. त तर दुसरीकडे अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एकत्रित पहिले काही वेळ बैठक झाली.
त्यानंतर अमित शहा आणि उद्धव ठाकरे याच्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत स्वतंत्र बैठक झाली. या बैठकीत
शिवसेना भाजप यांच्यातील राजकीय मतभेद आणि मनभेद यावर चर्चा झाल्याचं कळतंय. अमित शहा यांनी मोदी सरकार करत असलेल्या योजना निर्णय याची माहिती उद्धव ठाकरेंना दिली.
परंतु, अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूर ठेवण्यात आलं होतं. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यातच बंद दाराआड चर्चा झाली.
असा होता घटनाक्रम
संध्याकाळी 7.50 वाजता - अमित शहा मातोश्रीवर पोहोचले
- अमित शहांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच कारमध्ये पोहोचले
- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मातोश्रीवर येण्याचं टाळलं
- शिवसेनेच्या मंत्र्यांनी दानवेंची उद्धव ठाकरेंकडे तक्रार केल्यामुळे दानवेंना 'मातोश्री'वर प्रवेश नाकारला
रात्री 8.15 च्या सुमारास उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात बैठक सुरू
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या बैठकीतून दूर ठेवलं
- रात्री 9.30 च्या सुमारास बैठक संपली
- रात्री 10.11 वाजता अमित शहा मातोश्रीवरून बाहेर पडले
खुद्द उद्धव ठाकरे अमित शहांना सोडण्यासाठी दारापर्यंत आले होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours