कराड : पोलीस असल्याचा बनाव करून साखर कारखान्याच्या संचालकाकडून साडे चार कोटी रूपये लुटण्याचा डाव पोलिसांनी हाणून पाडला. विजापूर येथील साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकासह अन्य तिघांना बेदम मारहाण करून सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या रोख रकमेसह निवृत्त पोलीस उपअधीक्षक आणि अन्य एकाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
कराड जवळ दुपारी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गोटे येथे हा प्रकार घडला. या दरोड्या तील चार आरोपींना जेरबंद करण्यात कराड आणि रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातले 4 कोटी 48 लाख रूपयांची रक्कम आणि अपहरण केलेल्या व्यक्ती ना सोडवण्यात यश आले आहे.
या प्रकरणातील धक्कादायक बाब ही की या चार आरोपी मध्ये ठाणे पोलीस ठाण्यातील गजानन तदडीकर हा निलंबित पोलीस कर्मचारी सामील होता. या आधी सुद्धा या टोळीने पोलीस असल्याचे भासवून अनेक गुन्हे केल्याचा समोर आले आहे
कारखान्याच्या 225 कोटीच्या कर्ज प्रकरणासाठी कमिशन म्हणून 4 कोटी 50 लाख ही रक्कम पुण्याकडे घेऊन जात असताना कराड शहरा जवळ हॉटेल महेंद्र येथे सिने स्टाईल हा दरोडा टाकण्यात आला. या प्रकारामुळे कराड शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून राज्यभर तपास चक्रे फिरवत रत्नागिरी जिल्ह्यात रोख रकमेसह काही संशयितांना अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले. 1)गजानन तदडीकर 2)विकास कुमार मिश्रा 3)महेश भांडारकर 4) दिलीप म्हात्रे अशी ताब्यात घेतल्याची नावे आहेत.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours