मुंबई, 16 जून : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त मनसे कार्यकर्ते आज मुंबईत अनेक पेट्रोल पंपांवर स्वस्त पेट्रोल विक्री अभियान राबवतायेत. दादर, भायखळा, वांद्रे अशा 36 विभागांमधे 36 पेट्रोल पंपावर किमान 4 रूपये आणि कमाल 9 रूपयांनी स्वस्त पेट्रोल वाटप करण्यात येतंय.

मनसे कार्यकर्त्यांनी राज यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. कार्यकर्त्यांनी ढोल-ताशे वाजवत वाढदिवस साजरा करतायत. काही कार्यकर्त्यांनी नाणार प्रकल्पाचा केक आणि तर काहींनी ईव्हीएमची प्रतिकृती असलेला. राज यांच्या पत्नी शर्मिला, मुलगा अमित हे देखील या प्रसंगी उपस्थित आहेत.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours