येवला, 16 जून : एकनाथ खडसे यांचा मी आभारी आहे. कोणी कोणत्याही पक्षात असले तरी चालेल मात्र ओबीसीसाठी काम केलेच पाहिजे अशी प्रतिक्रिया माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
ओबीसी चळवळीमध्ये मी छगन भुजबळ यांच्या सोबत आहे असं सांगून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपली इच्छा बोलून दाखवली होती. एकनाथ खडसे यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, खडसे यांचा मी आभारी असून ते देखील अनेक वर्षांपासून ओबीसी समाजासाठी काम करीत आहे त्यांनी हाऊसमध्ये ही या बाबत वेळोवेळी आवाज उठवला आहे अशी आठवण भुजबळांनी काढली.
तसंच मी ओबीसीसाठी 1991 पासून काम करत आहे. माझ्यासोबत गोपीनाथ मुंडे यांनीही काम केलं आहे. आता खडसे काम करत आहे. सर्वच जातीचे काम केले पाहिजे तसंच ओबीसीमध्ये चारशेहून अधिक जाती आहे. त्यामुळे कोणी कोणत्याही पक्षात असले तरी चालेल मात्र ओबीसीसाठी काम केलेच पाहिजे असं भुजबळ येवला येथे दौऱ्यावर आले असताना बोलले.
Post A Comment:
0 comments so far,add yours