लातूर, 16 जून : लातूर शहरात पोटच्या मुलानेच जन्मदात्या आई वडिलांचा खून करण्याचा प्रयत्न केलाय आहे. चक्क नारळपाण्यातून त्यांना विष घालूम मारण्याचा प्रयत्न या मुलाने केला आहे. यात उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला आहे तर आई थोडक्यात बचावली आहे.
मालमत्तेच्या वाटनीसाठी आग्रही असलेल्या न्यानदीप कोटम्बे या 29 वर्षीय मुलाने आई गयाबाई कोटम्बे आणि वडील साधुराम कोटम्बे हे वाटनी करत नसल्याच्या कारणावरुण त्यांना नारळ पाण्यात विष घालून प्यायला दिलं. आणि त्यांच्या जीव घेण्याचा प्रयत्न केला.
नारळ पाणी पिल्यानंतर प्रकृति अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना लातुरच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी नेन्यात आले. मात्र उपचारा दरम्यान वडील साधुराम कोटम्बे यांचा मृत्यु झालाय, तर आई गयाबाई कोटम्बे यांची प्रकृति अद्यापहि गंभीर आहे.
या धक्कादायक प्रकारानंतर आई गयाबाई यांच्या जबाबावरुन मुलगा न्यानदीप कोटम्बे याच्या विरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कलम 302 , 307 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours