नागपूर ,ता.19 जून : पर्यावरण पूरक वाहनांसाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आग्रही आहेत. पण त्यांच्या या स्वप्नाला नागपुरातच ब्रेक लागलाय. मोठ्या धुमधडाक्यात उद्घाटन करण्यात आलेली स्कॅनिया बससेवा अखेर बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
इथेनॉलवर चालणाऱ्या ग्रीन बसचा हा प्रकल्प केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या 'ड्रीम प्रोजेक्ट'पैकी एक आहे. काही वर्षांपूर्वी पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत योग्य आणि इथेनॉल या इंधनावर चालणाऱ्या ग्रीन बसेस नागपूरकरांसाठी आणल्या होत्या. देशात पहिल्यांदाच इथेनॉलवर चालणाऱ्या 35 बस नागपुरात आणण्यात आल्या. पण या बसेसची सेवा बंद करण्याचा निर्णय स्क‌ॅनिया कंपनीनं घेतलाय. हा निर्णय पालिकेसाठीही धक्कादायक असाच आहे.
पालिका स्कॅनिया कंपनीला 85 रुपये प्रती किलोमीटर भाडं देतं. शिवाय दोन ठिकाणी जागा आणि शहर बसेससेवेचे सर्व बसस्थानकही दिले आहेत. या बसेसचे शुल्क साध्या बसच्या तुलनेत अधिक असल्याने याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. महानगरपालिका कंपनीला नियमित पैसेच देत नसल्याने गाड्या चालवायच्या कशा असा कंपनीचा सवाल आहे. त्याचबरोबर प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी योग्य ते प्रयत्नही न झाल्यानं ही स्थिती ओढवलीय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours