भंडारा, दि. 15 :-    आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने 14 ते 20 जून दरम्यान आयुष विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या वतीने  नर्सिग स्कुल भंडारा येथे सकाळी 6 ते 7 दरम्यान होणाऱ्या नि:शुल्क योग प्राणायाम शिबीराचा प्रारंभ आज झाला. 

या शिबीराची सुरुवात प्रार्थना व संकल्पाने करण्यात आली. त्यानंतर योगाचे महत्व व योगासनाचे शरिरावर होणारे परिणाम समजवण्यात आले. नंतर योगासन, प्राणायाम ध्यान शिकविण्यात आले. त्याचबरोबर योगासनाचे प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले. त्यामध्ये संधी संचालन, कपालभाती, अनुलोमविलोम, भ्रामरी प्राणायाम, ध्यान सम्भवी मुद्रा यांचा समावेश होता. योग वर्गाचा शेवट हा प्रार्थनेने करण्यात आला. सदर शिबीरात एकूण 40 लाभार्थी उपस्थित होते. यापुढील वर्गात ताडासन, वृक्षासन, पादहस्त आसन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, दंडआसन, वज्रासन, अर्ध उष्ट्रासन, संशकासन, व्रकासन, भुजंगासन, सलभासन, मकरासन, सेतूबंध आसन, पवन मुक्तासन, श्वासन यांचा समावेश असणार आहे. 

 सदर  शिबीरात माधूरी ठोंबरे, योग व निसर्गोपचार तज्ञ, वर्षा चाचरकर,  नर्सिंग स्कुल भंडारा येथील विद्यार्थीनी व जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours