सपादीका... सुनिता परदेशी
कारंजा(वाशीम),9जून : शेतकरी व सुरक्षा जवानांसाठी जय जवान, जय किशानचा नारा 9 जून रोजी शेतकऱ्यांचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिला होता.या दिवसाचे औचित्य साधत कारंजा (लाड) येथे अन्नदात्याचे अन्नदान आंदोलन करण्यात आले.
ऐन पेरणीच्या वेळेस तूर,हरबरा खरेदी नाही,विक्री केलेल्या तुरीचे पैसे मिळाले नाही, बोंड अळीचे पैसे मिळाले नाही, कर्जमाफीचा फायदा नाही,नवीन कर्ज मिळत नाही अश्या परिस्थिती शेती कशी करावी असे अनेक संकटात शेतकरी सापडला आहे. याचा प्रचंड रोस शेतकरी बांधवांत आहे,हा रोस व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी वेग वेगवेगळे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. काही शेतकरी संघटनानी रस्त्यावर भाजीपाला, दूध, तूर भेकून सरकार विरोधात रोस व्यक्त करीत आहे.शेतकरी हा अन्नदाता आहे त्यामुळे या भिकारडे सरकारला तूर, हरबरा व सोयाबीनचे अन्नदान करून सरकार दरबारी तीव्र भावना व्यक्त केला. या दरम्यान
तूर, हरबरा व सोयाबीनचे पोते
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दान केले. तूर , हरबरा व सोयाबीनचे पोते कारंजा तहसीलदार यांच्या मार्फत पाठविण्यात आले.
यावेळी
शेतकरी नेते माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, शेतकरी आंदोलक तथा शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार, चंद्रपूर जिल्हा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण जांभूळे, वाशीम जि. प. चे माजी अध्यक्ष ज्योतीताई गणेशपुरे,शेतकरी नेते गजानन अंदाबादकर यांचेसह आदी आंदोलक युवा शेतकरी नेत्यांनी शेतकरी बांधवाना संबोधित केले. या आंदोलनाचे आयोजन शेतकरी नेते गजानन अंदाबादकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी आंदोलन समिती कारंजा(लाड) जिल्हा वाशिम यांनी केले होते.यावेळी महिला शेतकरी व युवकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
Post A Comment:
0 comments so far,add yours