मुंबई,ता.23 जुलै : सर्व स्पर्धकांवर मात करत अभिनेत्री मेघा धाडे ने बाजी मारली आणि कलर्सच्या बिग बॉस मराठी च्या पहिल्या पर्वाचा किताब पटकावला. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाच्या ग्रॅण्ड फिनालेला धडाक्यात सुरूवात झाल्यानंतर सर्वांनाच प्रचंड उत्सुकता होती. चुरशीच्या या लढतीत मेघाने बाजी मारली आणि सर्वांची शिगेला पोहोचलेली उत्सुकता शांत झाली.
सोहळ्याच्य सुरूवातीला आस्ताद, सई, मेघा, पुष्कर, शर्मिष्ठा आणि स्मिता हे सहा स्पर्धक अंतिम सामन्यात पोहोचले होते. शोच्या सुरूवातीला शर्मिष्ठा या शर्यतीतून बाहेर पडली. त्यानंतर आस्ताद काळेचंही विजेता होण्याचं स्वप्न भंगलं. बिग बॉस मराठीमुळे सर्वांची लाडकी झालेली सई लोकूरलाही कमी मतं मिळाल्यामुळे बिग बॉसच्य घरातून बाहेर पडावे लागले होते.
१५ एप्रिल रोजी सुरू झालेला बिग बॉस मराठीचा खेळ अनेक कारणांनी गाजला. बिग बॉसच्या घरात जवळपास १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. दररोज नवीन वाद, नवीन टास्क, टास्कदरम्यान सेलिब्रिटींनी एकमेकांवर केलेली कुरघोडी यांनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. पण गेल्या आठवड्यापासून बिग बॉस मराठीचा पहिला विजेता कोण ठरणार याविषयी सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours