मुंबई,ता. 23 जुलै: मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी पंढरपूरमध्ये विठ्ठलाची शासकीय महापूजा करणार नाहीत. मात्र मुंबईतल्या वर्षा बंगल्यावर ते सपत्निक विठ्ठलाची महापूजा करणार आहेत. ज्यावेळी पंढरपूरमध्ये महापुजेला सुरवात होईल त्याच वेळी वर्षामधल्या महापुजेला सुरूवात होणार आहे. पंढपूरला जाता आलं नाही तरी पूजेचा नेम चुकवणार नाही. मी माझ्या निवास्थानीच महापूजा करणार असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं.आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या मराठी क्रांती मोर्चाने मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येण्यासाठी बंदी घातली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना लक्षात घेत मी पंढरपुरात जाणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मला खूप मोठी सुरक्षा आहे. मला कोणी हात नाही लावू शकत पण वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी मी पंढरपूरात जाणार नाही.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours