मुंबई, 24 जुलै : मुक मोर्चातून आक्रमक झालेल्या मराठा मोर्चात काल औरंगाबाद इथं मराठा आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरूणाचा मृत्यू झाला. याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीनं दिलीय. मुंबई, पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात बंदची हाक देण्यात आली आहे. या चारही ठिकाणी उद्या बंदचं आवाहन करण्यात आलंय. सार्वजनिक परिवहन सेवा, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांना अडथळा येणार नाही, असं समन्वय समितीनं स्पष्ट केलंय.
नवी मुंबईत वहानांची जाळपोळ
मराठा आंदोलनच्या मुद्द्यावरून आता ठिकठिकाणी वातावरण तापू लागलंय. याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. सोमवारी रात्री साडे नऊच्या दरम्यान मराठा समाजाच्या तरूणांनी पनवेल-सायन महामार्गावर वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न केला आणि रस्त्यावर टायर जाळून शासनाचा निषेध केला. दरम्यान, पोलीस घटनास्थळी पोहोचल्यामुले मोठी वाहतूककोंडी झाली नाही.
वारकरी खोळंबला
महाराष्ट्र बंदच्या हाकेमुळे काल रात्रीपासून पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची गैरसोय झाली. पोलिसांनी सर्व एसटी काही काळ थांबवून ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हजारो वारकरी एसटी स्थानकात खोळंबले होते. मराठा आंदोलकांनी गेल्या चार दिवसांमध्ये एसटी बसेसची मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ केलीय. यामध्ये सर्वात जास्त नुकसान हे पंढरपूरच्या वारीला येणाऱ्या बसेसचे नुकसान अधिक आहे. त्यातच काल महाराष्ट्र बंदची दिल्याने पोलिसांनी वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी बस वाहतूक काल रात्री काही काळ थांबबिण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे वारी पोहचती करून परतीच्या प्रवासाला निघालेले हजारो वारकरी प्रवासी बस स्थानकावर खोळंबले.
या मोर्चाचे परिणाम सोलापुरातही पहायला मिळाले.  सोलापूर शहरातही एसटीची तोडफोड करण्यात आलीय.  रुपाभवानी मंदिराजवळ ही घटना घडली. चारचाकी गाडीतून काही जणांनी एसटी रोखून धरली आणि ही तोडफोड केली.
पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर विशेषतः सातारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी पंढरपूरला जातात. आपल्याच वारकऱ्यांना बंदचा त्रास होऊ नये यासाठी आज महाराष्ट्र बंदच्या ऐवजी बुधवारी जिल्हा बंद पुकारण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर विशेषतः सातारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी पंढरपूरला जातात. आपल्याच वारकऱ्यांना बंदचा त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours