नालासोपारा, 24 जुलै : नालासोपाऱ्यात भररस्त्यावर गुंड आणि पोलिसांमध्ये चकमकीचा थरार उडाला होता. गुंडांनी पोलिसांवर हल्ला केला त्यामुळे पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरमध्ये एका गुंडाचा मृत्यू झालाय.

मिळालेल्या माहिती नुसार, 3 गुंड राधानगर येथे आल्याची माहिती तुळींज पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे त्यांना ताब्यात घेतले असता पोलिसांवर एकाने चाकूने वार करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. गुंडाने हल्ला केल्यानंतर पोलिसांनी  आरोपीवर गोळ्या झाडल्या यात राणा नामक गुंड जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. तर गुंडांनी केलेल्या हल्ल्यात 2 पोलीस जखमी झाले.  मंगेश चव्हाण,आणि मनोज सकपाळ हे पोलीस काॅन्सटेबल जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours