पंढरपूर, 21 जुलै : मुख्यमंत्र्याच्या महापूजेला मराठा आणि धनगर समाजाचा विरोध कायम आहे. पालकमंत्र्यांच्या बैठकीवरही आंदोलकांनी बहिष्कार टाकला. आंदोलक निर्णयावर ठाम असल्यामुळे मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याबाबत आता अनिश्चितता निर्माण झाली आहे.  आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही, म्हणून या विरोधावर मराठा, धनगर समाज ठाम आहे.  येत्या 23 जुलैला आषाढी एकादशी आहे. या एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्याच्या हस्ते संपन्न होत असते. या पूजेला मराठा क्रांती मोर्चा, महादेव कोळी समाज आणि धनगर समाजाच्या नेत्यांनी प्रखर विरोध दर्शविलाय.
दरम्यान, आज वारी सोहळ्यातला शेवटचा रिंगण सोहळा वाखरीमध्ये पार पडेल. आज तुकोबांच्या पालखीच दुसरं उभं रिंगण आणि तिसरे गोल रिंगण पंढरपूर जवळच्या बाजीरावची विहीर या ठिकाणी पार पडणार आहे. दुसरीकडे तुकोबांच्या पालखीचं संध्याकाळी दुसरं उभं रिंगण होईल.आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या सगळ्या दिंड्या पंढरपुरात दाखल होताहेत.
हरिनामाचा गजर वाढताना दिसतोय. पंढरपूरच्या जवळ आल्याचा आनंद वारकऱ्यांमध्ये दिसून येतोय. तुका म्हणे धावा धावा आहे पंढरी विसावा हा भाव मनात ठेवून वारकरी पंढरपुरात दाखल होताहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours