नागपूर,13 जुलै :  राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्र्याचे फायरब्रँड आमदार जितेंद्र आव्हाड या ना त्या कारणामुळे नेहमी चर्चेत राहतात. आता तर मला भगवत गीता तोंडपाठ आहे असा दावा करून जितेंद्र आव्हाड  प्रत्यक्ष मात्र गीतेतले श्लोक म्हणताना ते अडखळले आणि पत्रकारांनी गीता म्हणून दाखवा असं सांगितलं तेव्हा मात्र ते चिडले. उलट प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारालाच तुम्ही भाजपचे प्रवक्ते आहात का असा सवालच आव्हाडांनी विचारला.

जितेंद्र आव्हाड म्हणतात, भगवत गीतेचं जास्त राजकारण करत असतील तर मला संपूर्ण भगवत गीता पाठ आहे. यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत असं म्हणत अख्खी गीता तोंडपाठ म्हणण्याचं आमच्या आईवडिलांनी शिकावलं. पण मी आता प्रतिक्रिया देताना म्हणणार नाही असं जाहीरच करून टाकलं.
पत्रकारांनी आव्हाडांना गीता म्हणण्यासाठी आग्रह केला पण आव्हाडसाहेब पत्रकारांवरच भडकले. "तुम्हाला ऐकायची असेल तर बाजूला या...लगेच म्हणून दाखवतो...तुम्ही भाजपचे प्रवक्ते म्हणून आलाय का ?, तुम्ही एकटे विचारताय म्हणून या बाजूला सगळी गीता म्हणून दाखवतो आणि म्हणून दाखवलं तर काय देणार तुम्ही ?, मग वगैरे काही नाही असेल टाईमपास धंदे मी करत नाही असा सूरच आव्हाडांनी लगावला.
दरम्यान, राज्यातल्या नॅक ए, आणि ए प्लस मान्यता प्राप्त महाविद्यालयांमध्ये भगवत गीता वाटप करण्याचा शिक्षण संचलनालयानं आदेश दिले आहे. या महाविद्यालयांनी शिक्षण संचालकांच्या कार्यालयातून भगवत गीतेच्या प्रती घेऊन जाव्यात,असा लेखी आदेश सहाय्यक संचालकांनी काढला आहे. यासंदर्भातला निर्णय शिक्षण विभागानं 20जून 2018ला काढला होता. त्यांच्या या निर्णयावरून विरोधकांनी एकच टीकेची झोड उठवलीये.
भगवत गीता वाटपाला विरोधकांनी विरोध केलाय. निवडणुकीच्या तोंडावर हा खोडसाळपणानं काढलेलं अस्त्र आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केलीये. तर हे सरकार स्वत:च्या पैशांतून करत नाहीये. फक्त गीतेलाच विरोध कशासाठी असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी विचारलाय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours