मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी भावनिक ट्विट करत दिलीप साहेबांच्या प्रकृती विषयी प्रार्थना करण्याचं आवाहन त्यांच्या चाहत्यांना केलं आहे. तुम्हा सर्वांवर अल्लाची असीम कृपा राहो. तुम्ही माझ्या ‘कोहिनूर’च्या आरोग्यासाठी आणि ते आनंदी राहावेत यासाठी प्रार्थना करा असं आवाहन त्यांनी चाहत्यांना केलं. दिलीप साहेबांची प्रकृती सध्या ठिक आहे. ते घरीच आराम करत आहेत असंही त्यांनी सांगितलं. वृद्धापकाळामुळे दिलीप कुमार यांची प्रकृती अनेकदा ठिक नसते. त्यांना वारंवार उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लगातं त्या पार्श्वभूमीवर सायरा बानो यांच्या या ट्विटकडे पाहिलं जात आहे. 29 जून २०18 रोजी माझ्या ‘कोहिनूर’शिवाय मी एका कार्यक्रमात उपस्थित होते.
दिलीप साहेबांशिवाय एखाद्या कार्यक्रमात जाणं हे फार क्विचितच होतं अशी वेदनाही त्यांनी ट्विटरवर व्यक्त केली. असिफ फारुखी यांची मुलगी निदा हिच्या लग्नात सायरा बानो या उपस्थिती होत्या. त्यावेळी त्यांना दिलीप साहेबांची उणीव भासली आणि त्यांनंतर एकामागून एक ट्विट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Post A Comment:
0 comments so far,add yours