रिपोर्टर: परदेशी 
भंडारा : जिल्ह्याचे सर्वेसर्वा अधिकारी म्हणून ओळख असलेल्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या निवासस्थान (बंगला) सभोवतालचा परिसर समस्यांनी ग्रासला आहे. नाल्या तुंबल्या असून दुर्गंधीमुळे समस्येत वाढ झाली आहे. याकडे जिल्हाधिकारी लक्ष देणार काय? असा सवाल उपस्थित होतो.
जिल्ह्याचे मुख्यालय लाभलेल्या भंडारा शहरात विविध शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था, शाळा, महाविद्यालय, बँका यासह अन्य आस्थापने आहेत. बहुतांश शासकीय कार्यालयाचा परिसर हा समस्यांनी वेढलेला आहे. विशेष म्हणजे सिव्हील लाईन परिसरात असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थानही समस्यांच्या विळख्यात आहे. त्यात जिल्हाधिकाºयांचे निवासस्थानही सुटलेले नाही. जिल्हाधिकाºयांचा बंगला आतून झकास असला तरी बाहेरून भकास आहे. निवासस्थान सभोवताल वॉल कंपाउंड असले तरी नाल्या संपूर्णत: चोक आहेत. पावसाचे पाणी वाहून जात नसल्यामुळे तिथेच साचल्या जाते. काही महिन्यांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी सुहास दिवसे असताना निवासस्थानामागील परिसरात अतिरिक्त लोखंडी जाळी बसवून सुरक्षा कठड्यांची निर्मिती करण्यात आली. येथे असलेल्या फुटपाथ व किरकोळ व्यवसायीकांना हटविण्यात आले होते. जेसीबी लावून नाल्यांमधील गाळ उपसण्यात आला होता. मात्र त्यानंतर काम थंडबस्त्यात गेले.
सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस असून नाल्यांमध्ये केरकचरा व मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. साईमंदिर मार्गावरील जिल्हाधिकाºयांच्या बंगल्यामागील परिसरातील सुरक्षा भिंतीजवळ उत्तर व दक्षिण दिशेला मुतारी आहे. याची अवस्था अत्यंत वाईट आहे. निवासस्थानाच्या उत्तर दिशेला सामाजिक न्याय भवन असले तरी त्या भागाची अवस्थाही हवी तितकी योग्य नाही.
राष्ट्रीय महामार्गासमोरील भागही दुर्लक्षित आहे. येथे मोठ्या प्रमाणात झाडी झुडपी वाढली असून नाली आहे किंवा नाही असे जाणवते.
जिल्ह्याचे मुख्यमंत्री म्हणून जिल्हाधिकाºयांची ओळख असताना त्यांच्या निवासस्थान सभोवतालची अवस्था बघून कुणालाही नवलच किंवा खंत वाटेल, यात शंका नाही.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours