रिपोर्टर- हर्षीता ठवकर

पालांदूर : पावसाचा खंड व बांध्यात पाणी नसल्याने लष्करी अळीचा हमखास प्रादुर्भाव आढळतो. अलीकडे जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरु असून काही भागात धानाच्या नर्सरीत व रोवणी झालेल्या ठिकाणी लष्करी अळीचे आक्रमण आढळले आहे, अशी माहिती लाखनी तालुक्याचे कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, वरिष्ठ भात पैदामकार डॉ. जी. आर. शामकुंवर व मंडळ कृषी अधिकारी पालांदूर यांनी 'लोकमत'ला दिली आहे.
धान पिकाची लागवड सुरु झालेली आहे. चुलबंद खोºयात ८० टक्के रोवणी आटोपली आहे. रोवणीनंतर बांधानात पाणी नसल्याने काही शेतात लष्करी अळी जोर मारु शकते. जुलै व आॅगस्ट महिन्यात शक्यतो लष्करी अळी हजेरी लावते. परिणामी शेतकरी संकटात सापडून उत्पादनात घट होण्याची शक्यता असते. वातावरणात बदल होत असल्याने पालांदूर परिसरात लष्करी अळीचे आक्रमण आढळून आले आहे. शेतकºयांनी नर्सरीत व रोवणीत लक्ष पुरविण्याचे आवाहन कृषी अधिकाºयांनी केले आहे. लष्करी अळीची एक पिढी पूर्ण होण्यास ३० ते ४० दिवस लागतात. या अळ्या लष्काराप्रमाणे पिकावर हल्ला चढवतात.
या अळ्या दिवसाला शांत राहत रात्रीला जोरदार आक्रमण करतात. दिवसा धानाच्या बोचक्यात, झुडात, खामल्यात, मुळाशेजारी वास्तव करतात. धिुºयावरील गवतात लपून बसतात. पाने कुरडतात. यात धानपिकाचे मोठे नुकसान शक्य आहे. या अळीचा व्यवस्थापनाकरिता शेतांचे बांध स्वच्छ ठेवावे. धानाच्या बांधात पाणी साचवून ठेवावे. धानावरील अळ्या दोराच्या किंवा झाडाच्या फांद्याचा उपयोग करुन पाण्यात बेडकाचे संवर्धन करावे, लष्करी अळीच्या नियंत्रणाकरिता डायक्लोरोव्हास ७६ ईसी, १२५० मिली, १० लिटर पाण्यात मिसळून सकाळी किंवा सायंकाळी फवारणी करावी, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यानी केले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours