मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठी अस्तिमतेचा मुद्दा उपस्थित केलाय. मराठी माणसांचं अस्तित्व मुंबईतून पुसून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलाय. मुंबईतलं मराठी माणसांचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे. इंच इंच विकू हेच राज्य कर्त्यांचं धोरण असल्याची टीकाही त्यांनी केली.
मुंबईतल्या वांद्रा इथं असलेल्या शासकीय वसाहतीला त्यांनी भेट आणि लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या. पुनर्विकासासाठी इथल्या नागरिकांना घरं सोडायला राज्य सरकार सांगत आहे. इथल्या नागरिकांचा त्याला विरोध आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी राज ठाकरे इथं आले होते.
या वसाहतीतल्या मराठी माणसांना हुसकावून लावत तिथे परप्रांतियांना वसवण्याचा डाव असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला. इंच इंच विकू हे राज्यकर्त्यांचे धोरण आहे. परप्रांतियांच्या झोपडपट्ट्या वसवायच्या आणि नंतर त्यांना हक्कांची घरं द्यायची आणि इथल्या मराठी माणसांना बेघर करायचं हा राज्यकर्त्यांचा डाव आहे.
कुठलही सरकार आलं तरी या धोरणात बदल होतं नाही. मुंबईतल्या मराठी माणसांचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असून त्यासाठीच बुलेट ट्रेनचा हट्ट केला जात आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours