औरंगाबाद : माझा पती निर्दोष आहे. या प्रकरणाशी त्याचा काहीही संबंध नाही. त्याला या प्रकरणात त्याला उगाच गोवण्यात आलंय. 20 आॅगस्ट आधी सीबीआयला तपास कुठपर्यंत आला हे जाहीर करायचं होतं म्हणून माझा पती सचिन अंदुरेला अटक केली असा आरोप सचिनची पत्नी शीतल अंदुरेनं केलाय. दरम्यान, सचिन अंदुरेला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.
अंनिसचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणी औरंगाबादमधून सचिन अंदुरेला अटक करण्यात आली. सोमवारी 20 आॅगस्ट रोजी दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्ष पूर्ण होणार आहे. त्याआधी सीबीआयने मोठी कारवाई करत मारेकऱ्याला जेरबंद केलं. मात्र, दुसरीकडे त्याची पत्नी शीतल अंदुरेनं आपल्या पतीचा यात काहीही दोष नाही असं म्हटलंय. माझ्या पतीला सीबीआयने अडकवले आहे. या प्रकरणाशी सचिन चा काडीमात्र संबंध नाही. सचिनला आधी 14 आॅगस्टला एटीएसचे अधिकारी मुंबईला घेऊन गेले होते. त्यानंतर 16 तारखेला घरी आणून सोडलं. नंतर सीबीआयचे अधिकारी आले आणि त्याला घेऊन गेले. त्याचा यात काही दोष नाही सीबीआयने माझ्या पतीला गोवलंय असा आरोप शीतलने केलाय.
20 आॅगस्टपर्यंत सीबीआयला आरोपीबद्दल जाहीर करायचं होतं. सीबीआयकडे कोणताही पर्याय नव्हता म्हणून माझ्या पतीला अटक केली असा आरोपही तिने केला.  मी सचिनला कॉलेजपासून ओळखते तो असं काहीच करू शकत नाही असा दावाही शीतलने केला.
दरम्यान, सचिनने आपणच दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्यात असा कबुली जबाब दिलाय. त्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली. 0 आॅगस्ट 2013 रोजी अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर  हे सकाळी सात वाजेच्या सुमारास माॅर्निंग वाॅकसाठी गेले होते.  पुण्यामध्ये ओंकारेश्वर पुलावर पोहोचले असता तिथे दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून खून केला. त्यानंतर तिथून ते पसार झाले. सचिन अंदुरेच्या चौकशीतून नवीन माहिती समोर आली. ज्या दिवशी दाभोलकरांवर गोळीबार झाला त्या दिवशी सचिन अंदुरे हा दुसऱ्या दुचाकीवरून पसार झाला होता. जे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले होते. त्यात सचिन अंधुरे आणि त्याचा साथीदार दोघे ही मोटारसायकल वरून आले नाही. सचिन आणि त्याचा सहकारी दोघेही ओंकारेश्वर पुलावरच उभे होते. दाभोलकर समोरून येत असता दोघांनी त्यांच्याजवळ जाऊन गोळ्या झाडल्यात.  या दोघांनी दाभोळकरांवर दोन दोन राउंड फायर केले. या दोघांकडे एकूण 3 रिव्हॉल्व्हर होत्या अशी माहिती समोर आलीये.
फायरिंग केल्यानंतर या दोघांसाठी चावी लावून मोटारसायकल तयार उभी करून ठेवली होती.  त्या मोटरसायकल वरून सचिन आणि त्याचा साथीदार पळाले अशी माहिती सचिन अंधुरेंनी चौकशी दिल्याचं कळतंय.
त्याच्या या माहितीच्या आधारावरून पुलाजवळ चावी लावून कुणी गाडी आणून ठेवली होती ?, अजून किती लोकं यात सहभागी होते ? असे सवाल आता उपस्थितीत झाले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours