पुणे : व्यसनाधिन बापाच्या वागण्याला कंटाळलेल्या पोटच्या पोरानेच मित्रांच्या मदतीने त्याची गळा आवळून हत्या केली आणि त्याचा मृतदेह कॅनॉलामध्ये फेकला. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर सिंहगड पोलिसांनी मुलाला अटक केली. त्याला २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा न्यायालयाने दिले आहेत.
अटक केलेल्या मुलाचे नाव गणपत बापु शेडगे असे असून तो वडगावच्या तुकाईनगरील रहिवासी आहे. पोलिसांनी आणखी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. बापु अशोक शेडगे (वय ४०, रा. तुकाईनगर) असे हत्या झालेल्या बापाचे नाव आहे. १२ ऑगस्ट रोजी हडपसर येथील कवडे मळा परिसरात घडलेल्या या घटनेची फिर्याद एका पोलीस शिपायाने सिंहगड पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
१२ ऑगस्ट रोजी मगरपट्टा बिट मार्शल ड्युटीवर गस्त घालत असताना ससाणेनगरातील कॅनॉलमध्ये एक शव वाहत जात असल्याची माहिती त्यांना मिळली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून कॅनॉलमधून शव बाहेर काढले. हातपाय बांधून त्यांना कॅनॉलमध्ये फेकून दिले असल्याचे दाखल फियार्दीमध्ये नमूद आहे. दरम्यान, गणपत याने श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात हजर राहून आपणच वडिलांचा दोरीने गळा आवळून आणि लाटण्याने मारहाण केल्याचे कबूल केले. मारहाणीनंतर त्याने हातपाय बांधून घराजवळच्या कॅनॉलमध्ये वडीलांचे शव फेकून दिले, अशी कबूली दिली.
या प्रकरणी आज गणपतला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यात वापरलेली दोरी, लाकडी दांडके जप्त करण्यासाठी, त्याचे आणखी इतर कोणी साथीदार होते का? याचा शोध घेण्यासाठी त्याला २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours