महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर.....जाफरी
।प्रतिनिधी/भंडारा।३१ जुलै
शाळेतील शिक्षकांचे मासीक पगार बिल काढतेवळी शाळेची मिनी बस मेन्टनेंस व शाळेला लागणारा इतर किरकोळ खर्चाकरीता सहा हजार रूपयाची लाच मागणाड्ढया ज्ञानगंगा मतिमंद व सी.पी.मुलाची शाळा,तुमसर येथील प्रभारी मुख्याध्यापकाला एसीबीच्या अधिकाड्ढयांनी अटक केली.गणेश कठिरामजी मेहर असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे.
तक्रारदार हे सन २०१२ पासुन ज्ञानगंगा मतिमंद व सी.पी.मुलाची शाळा,तुमसर येथे नियमित विशेष शिक्षक पदावर कार्यरत असुन तक्रारदार व शाळेतीलअन्य शिक्षकांना शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक गणेश कठिरामजी मेहर हे दर महिन्याला पगार बिल काढतेवळी शाळेची मिनी बस मेन्टनेंस व शाळेला लागणारा इतर किरकोळ खर्च याकरीता प्रति माह दोन हजार रूपये प्रमाणे माहे एप्रिल,मे व जुन या तिन महिन्याचे एकुण मिळुन सहा हजार रूपये लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने त्यासंदर्भात भंडारा एसीबीकडे तक्रार नोंदविली असता आज दि.३१ जुलै रोजी एसीबीच्या अधिकाड्ढयांनी सापळा रचुन प्रभारी मुख्याध्यापक गणेश कठिरामजी मेहर यांना तक्रारदाराकडुन वरील कामाकरीता सहा हजार रूपयाची लाच स्विकारतांना रंगेहात  अटक केली. आरोपिविरूध्द भंडारा पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कामगिरी नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक दिनकर सावरकर,पोनि.योगेश्वर पारधी,पोनि.प्रतापराव भोसले,पोहवा.संजय कुरंजेकर,नापोशि.गौतम राऊत,सचिन हलमारे,रविंद्र गभने,पोशि.शेखर देशकर,अश्विनकुमार गोस्वामी,पराग राऊत,कोमलचंद बनकर,चानापोशि.दिनेश धार्मीक यांनी केली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours