लाखांदुर प्रतीनीधी,
महाराष्ट्र निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्राम पंचायत निवडणूकीचा निकाल 14 ऑक्टोंबर रोजी जाहीर केले आहे परंतु 14 ऑक्टोंबर हा दिवस बौध्द बांधवांनी मोठा आनंदाचा दिवसतो व त्या दिवसी संपूर्ण देशात बौध्द अनुयायी दीक्षा समारोह,धम्म महोत्सव,धम्म चक्र पर्वतन दिन म्हणुन साजरा करतात त्यामुळे 14 ऑक्टोंबर ऐवजी 15 ऑक्टोंबर ला ग्राम पंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर करावा असे निवेदन लाखांदुरचे तहसीलदार वैभव पवार यांचे मार्फत मा. निवडणूक आयोग माहाराष्ट राज्य मुंबई यांना देण्यात आला आहे
दलितांचे कैवारी,भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,विश्वरत्न,परमुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षापासुन विषमतावादी व्यस्थेत खितपत पडलेल्या समाजाला समता, बंधुता, न्याय, समानता, आणी स्वातंत्रता असलेली विदन्यान वादी धम्म देण्यासाठी 14 ऑक्टोंबर 1956 ला दीक्षा भुमी नागपुर येथे लोखो लोकांसमेत बौध्द धम्माची दिक्षा घेतली तेव्हा पासुन हा दिवस संपूर्ण भारतभर धम्म चक्र प्रवर्तन दिन म्हणुन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असुन या दिवसी गावो गावात बौध्द बांधव मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करीत असतात.
त्यातच निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्राम पंचायत निवडणूकीचा निकाल त्याच दिवसी जाहीर केलेल्याने एकीकडे बौध्द समाजाचा सुरू असलेला कार्यक्रम व दुसरीकडे ग्राम पंचायतच्या निवडणूकीचा आनंद साजरा करणारे यांच्यात राजकीय द्वेष भावनेतुन कलह निर्माण होण्याचे नाकारता येत नाही त्यामुळे गावातील शांतता व शुव्यवस्था भंग होऊन जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मा .निवडणूक आयोग माहाराष्ट राज्य मुंबई यांनी होणा-या ग्राम पंचायत निवडणूकीचा निकाल 14 ऑक्टोंबर ऐवजी दुस-या दिवसी जाहीर करावा अन्यथा बौध्द बांधवांच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा बुध्दिस्ट समाज संघर्ष समिति लाखांदुर च्या वतीने मा. तहसीलदार वैभव पवार यांचे मार्फत मा. निवडणूक आयोग माहाराष्ट राज्य मुंबई यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आला आहे यावेळी निवेदन देतांनी ,मंगेश सुखदेवे,रोशन फुले,मनोज बंन्सोड, जयंत टेंभूर्णे,वासुदेव तोंडरे,ताराचंद सोनवाने,कैलास जांभुलकर,देविदास मेश्राम, नरेश सोनटक्के, ओमप्रकाश सोनटक्के,ओमप्रकाश सुखदेवे,व बुध्दिष्ठ समाज संघर्ष समिती लाखांदूरचे पदाधिकारी उपस्थित होते
Post A Comment:
0 comments so far,add yours