मुंबई, 26 आॅगस्ट : विजय चव्हाण यांच्या निधनानंतर सुरू झालेला मामा वाद अजूनही सुरूच आहे. काल अभिनेता जितेंद्र जोशीनं दिग्दर्शक सचिन कुंडलकरला चांगलंच फैलावर घेतलं होतं. आता दिग्दर्शक सुनील सुखटनकरांनीही त्यावर पोस्ट टाकलीय. अभिजात या विशेषणाचा अर्थ ज्यांच्या कलाकृतीकडे पाहून मी समजलो त्या सुनील सुकथनकर आणि सुमित्रा भावे यांच्या विषयी माझ्या मनात अपार आदर आहे. कृपया त्यांना या गलिच्छ अहमहमिकेत आणू नका ही विनंती. असं जितेंद्रनं लिहिलंय.
यावर दिग्दर्शक सुनील सुखटनकरांनी जीतू, अत्यंत योग्य प्रतिक्रिया दिली आहेस. सोशल मीडिया हे एक निर्दय ठिकाण आहे म्हणून कमीत कमी वेळा त्यात प्रतिक्रिया द्यावीशी वाटते, असं म्हटलंय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours