कल्याण, 26 ऑगस्ट : आपण बाहेर कुठे गेलो की सहज एखाद्या किराणाच्या दुकानातून पिण्यासाठी कोलड्रींग्ज घेतो. पण आता मात्र असं काही करण्याआधी जरा थांबा कारण कल्याणमध्ये एका किराणा मालाच्या दुकान 'माझा' हे शितपेय घेतल्यानंतर त्यामध्ये किडे सापडले आहेत. कल्याणच्या मलंगगड रोडवरील नांदिवली परिसरातला हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कल्याणच्या गणेश जाधव या तरुणाने एका दुकानातून माझा विकत घेतलं. त्यात झाकणाच्या आतल्या बाजूने आणि बाटलीत जिवंत किडे आढळले आहेत. या सगळ्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पण या सगळ्यातून लक्षात ठेवा की आता फक्त एक्सपायरी डेट बघून चालणार नाही ते पेय योग्य आहे हे पाहणंही महत्त्वाचं आहे.
दरम्यान, याबाबत एफडीएकडे तक्रार करण्यात आली असून उद्या एफडीए अधिकारी याठिकाणी येऊन तपासणी करणार आहेत. पण खाद्यपदार्थांतून कशा पद्धतीने आपल्या जीवाशी खेळ केला जातोय हेच या प्रकारामुळे समोर आलं आहे.
मंडळी, तुम्ही जर कोणतंही शितपेय विकत घेणार असेल तर ते घेण्याआधी नक्की तपासून बघा.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours