26 ऑगस्ट : माळशेज घाटात कोसळलेली दरड अखेर हटवण्यात आली आहे. त्यामुळं तब्बल पाच दिवसांपासून बंद असलेली माळशेज घाटातली वाहतूक सुरू झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर खंडाळ्याजवळ मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली होती. अप आणि मिडल लाईनवर ही दरड कोसळल्याने लोणावळ्याकडून मुंबईला जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. त्यामुळे रेल्वेचं वाहतूकही कोलमडलं होतं.
दरड कोसळल्याने गेल्या दोन तासापासून कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेस खोळंबली होती. काल कोसळलेल्या या मार्गावरील दरड हटवण्यासाटी ६ तासांचा कालावधी लागला होता. मात्र, हा मार्ग पूर्णपणे ठप्प झाल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल होत. पण घाटात सतत पडणाऱ्या पावसात देखील महामार्गाच्या कर्मचाऱ्यांनी कामात सातत्य ठेवल्याने आज सुरू झाला आहे.
दरम्यान, सध्या माळशेज घाटात पर्यटकांवर बंदी घालण्यात आली होती. पण अखेर गेल्या पाच दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद असलेला माळशेज घाट सुरू करण्यात आला. नॅशनल हाय-वेची टीम, पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाच्या अथक मेहनतीने पाच दिवसानंतर हा घाट वाहतुकीसाठी सुरू झालाय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours