भंडारा येथे धनगर समाजाची सभा●
●मुख्यमंत्र्यांना निवेदन●
प्रकाश हातेल
अड्याळ - धनगर समाजाच्या आरक्षणासाठी अनेकदा आश्वासन देऊनही त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे धनगर समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे १२ आँगस्ट पर्यत मागण्याची पूर्तता न झाल्यास १३ आँगस्टला अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्य त्यांना अभिवादन करुन राष्ट्रीय राज्य महामार्ग आर टि ओ कार्यालय भंडारा समोर रास्तारोको व अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी कार्यक्रम करण्याचा इशारा जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना धनगर समाज संघर्ष समिती भंडारा च्या वतीने निवेदन देवून केला आहे.
       धनगर समाज संघर्ष समिती भंडारा/गौंदिया जिल्हाध्यक्ष राजकुमार मरठे यांचे अध्यक्षतेखाली पंडितराव पांडे यांचे निवास स्थानी धनगर समाजाची सभा घेण्यात आली. सभेत जिल्हाउपाध्यक्ष प्रकाश हातेल संघटक पंडितराव पांडे,जयशंकर घटारे,प्राचार्य  शंकर गायकि,राजन पडारे,प्रसिधिप्रमुख तुळशिदास खवूळ,प्रमोद फोपसे,वर्षाव अहिर,नितीन चावटकर आदिमान्यवर उपस्थित होते.
     जिल्हाध्यक्ष राजकुमार मरठे म्हणाले धनगर समाजाच्या आरक्षणाबाबद २०१४ च्या निवडणूकिपूर्वी विविध सभात सत्तेत येताच धनग समाजाला तात्काळ आरक्षण लागू करू असे वचन भाजप सरकार तर्फे देण्यात आले होते.तशा प्रकारे पत्रहि धनगर समाज संघर्ष समितिला देण्यात आले.परंतू सत्तेत येऊन चार वर्षे लोटूनहि आरक्षणाचा प्रश्न ताटकळत ठेवला आहे.शासन धनगर समाजाची फसवणूक करीत असल्याची समाज बांधवाची धारणा झाली असुन त्यांच्यात असंतोष खदखदत आहे.नागपूर येथील धनगर आरक्षण निर्णयक मेळाव्यात धनगर आरक्षणा सोबतच सोलापूर विद्यापीठाला पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र अद्यापही विद्यापीठाचे नामकरण करण्यात आले नाहि त्यामुळे धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्याची शिफारस केन्द्र सरकार कडे करूनत्या त्वरीत लागू कराव्या, धनगरांना मेंढ्या चराईसाठि वनजमीनीवर रोपण करण्याच्या अटिवर २० मेंढ्या मागे ५ एकर वनचराई क्षेत्र उपलब्ध करून द्यावे, सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, नागपूर विमानतळावरुन शेळ्या-मेंढ्याचीनिर्यात सुरु करावी, धनगर जमातीच्या उन्नत्तीसाठि राष्ट्रीय शेफर्ड कमिशनची स्थापना करावी आदि मागण्या यावेळी करण्यात आल्या.
      १२ आँगस्ट पर्यत मागण्याची अंमलबजावनी न झाल्यास १३ आँगस्टला पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साकोली-नागपूर राज्य महामार्गावर आर टि ओ आँफिस भंडारा समोर रास्तारोको आंदोलन व पु्ण्यतिथी कार्यक्रम करण्याचा इशारा देणारे निवेदन तयार करण्यात आले.
      संचालनव आभार जयशंकर घटारे यांनी केले सभा आटपून संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री ,पोलीस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours