क्रॉइम रीपाेटर.. संदीप क्षीरसागर लाखनी

मुरमाडी ते लाखनी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील काढलेला अतिक्रमणाचा मलबा त्वरित हटविण्यात यावा -
लाखनी राष्ट्रवादी काँग्रेस ची मागणी

मा. भूपृष्ठ व वाहतूक मंत्री, भारत सरकार यांनी मुरमाडी ते लाखनी पर्यंत उड्डाण पूल मंजूर केलेले आहे. त्या अनुषंगाने उड्डाण पुलाचे काम सुरू करण्याच्या हेतूने माहे जून 2018 ला मुरमाडी ते लाखनी शहरातील महामार्गावरील अतिक्रमण काढण्याकरिता अनेक स्थावर मालमत्तांना जमीनदोस्त करण्यात आले. त्यामुळे मुरमाडी ते लाखनी पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला पडक्या घरांचा मलबा पसरलेला आहे. आज रोजी दोन महिने लोटूनही महामार्गावरील तोडण्यात आलेला अतिक्रमणाचा मलब्याचा ढिगारा व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोर, नागरिकांच्या घरांसमोर पडलेला आहे. त्यामुळे मुरमाडी ते लाखनी पर्यंत च्या दोन्ही बाजुच्या रस्त्यांवरून ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवून रस्त्यावरुन ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे मुरमाडी ते लाखणी पर्यंतचा महामार्ग पुन्हा मृत्यूच्या दारासमोर उभा आहे. त्यामुळे केव्हाही मोठी जीवहानी होण्यास वेळ लागणार नाही.

करीता येत्या ७ दिवसात मुरमाडी ते लाखनी पर्यंतचा महामार्गावरील मलबा हटविण्यात न आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लाखनी तर्फे हा सर्व मलबा तहसील कार्यालयात टाकण्यात येईल. तसेच उद्भवणाऱ्या प्रसंगास प्रशासन स्वतः जबाबदार असेल.

या आशयाचे निवेदन मा. भूपृष्ठ वाहतूक मंत्री भारत सरकार, मा. जिल्हाधिकारी साहेब भंडारा, मा. संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना देण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष धनु व्यास, तालुकाध्यक्ष डॉ. विकास गभने, महिला तालुकाध्यक्ष उर्मिला आगाशे, शशीकांत भोयर, निलेश गाढवे, प्रशांत मेश्राम, राजू शिवरकर, नितीन निर्वाण, विजय चाचेरे, आकाश गहरवार, सीताराम गिर्हेपुंजे, भीमाबाई परतेकी व राष्ट्रवादी काँग्रेस लाखनीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours