पुण्यात कोंढवा-कात्रज रस्त्यावर खडीमशीन चौकाजवळ 4 गाड्यांचा विचित्र अपघात झाला. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास कात्रजकडून मंतरवाडीकडे जाणाऱ्या ट्रेलरनं इनोव्हा गाडीला धडक दिली.
लोखंडी प्लेटा भरलेला ट्रेलरनं धडक दिल्यानं चार गाड्या एकमेकांना धडकल्या. त्यामुळे कात्रज कोंढवा रस्त्यावरील वाहतूक एक तास विस्कळीत झाली होती.
तर होंडा सिटी गाडीची व्हिंटो गाडीला मागून धडक बसल्यानं चारही गाडांचं मोठं नुकसान झालं. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी नाही.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours