नाशिक, 08 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांआधी नाशिकच्या पंचवटी परिसरातील मायको दवाखान्‍याजवळ राहणार्‍या संगीता देवरे, त्यांची तान्ही मुलगी आणि आई या तिघींना जाळण्याच्या धक्कादायक प्रकार घडला होता. त्याती माथेफिरू प्रियकराला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या प्रेयसीच्या मुलीला आणि नातीला जिवंत जाळून प्रियकराने पळ काढला होता. यात 10 महिन्याच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला होता. तर उपचारा दरम्यान प्रिती शेंडगेचाही मृत्यू झाला होता. पळ काढल्यानंतर माथेफिरू उत्तर प्रदेशमध्ये जाऊन लपला होता. पण अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
संशयित जलालुद्दीन खान याने प्रेयसीसह तीन महिलांना जणांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या पंचवटी परिसरात ही घटना घडली होती.
संगीता या महिलेचं एका व्‍यक्‍तीबरोबर अनैतिक संबंध होते. रविवारी मध्यरात्री त्यांचे वाद झाल्यानंतर आई, मुलगी आणि नातीला आईच्या प्रियकराने जाळून ठार मारण्याचा प्रयत्‍न केला. यामध्ये बालिकेचा जळून मृत्यू झाला. प्रिती शेंडगे आणि तिची मुलगी 10 महिन्याची सिद्धी शेंडगे आपल्या आई संगिताला भेटण्यासाठी दोन दिवसापुर्वी नाशिकमध्ये आल्या होत्‍या.
यावेळी मध्यरात्री आईच्या प्रियकराबरोबर आईचा वाद झाला. या वादानंतर त्या प्रियकराने पहाटेच्या सुमारास बेडवर रॉकेल ओतून आपल्या प्रियेसी, तिच्या मुलीला आणि नातीला जिवंत जाळण्याचा प्रयत्‍न केला. यात 10 महिन्याची चिमुकली आणि तिच्या आईचा मृत्यू झाला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours