दुबई, 25 मार्च : कोरोनाव्हायरसमुळे एक भारतीय तरुण संयुक्त अरब अमीरात (यूएई) मध्येच अडकला आहे. कोरोना विषाणूचा वाढता फैलाव लक्षात घेत तरुणाला मायदेशी परत यायचं होतं. पण दुबईच्या विमानतळावरून भारतात येणारं शेवटचं उड्डाण सुटलं. त्यामुळे हा तरुण आता दुबईतच अडकला आहे. ते झालं असं की आता या तरुणाला दुबईमध्येही जाण्यास परवानगी दिलेली नाही. कारण यूएईने कोरोना रोखण्यासाठी निवासाचा व्हिसाधारकांना प्रवेश देण्यास नकार दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुणसिंग असं परदेशी अडकलेल्या तरुणाचं नाव आहे. तो महाराष्ट्रातील पुण्यातील राहणारा आहे. 22 मार्च रोजी दुबई विमानतळावर आले. तेथून अहमदाबादसाठी सकाळी 4 वाजता अॅमिरेट्स एअरलाइनच्या विमानात बसणार होते. पण अरुणसिंग वेळेआधीच विमानतळावर पोहोचले. त्यामुळे वेटिंगरुममध्ये त्यांना झोप लागली. गाढ झोप लागल्यामुळे शेवटचा बोर्डिंग कॉल मिस झाला.
अरूण यांना यूएईमध्येही पुन्हा प्रवेश करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे ते दुबईच्या विमानतळावरच अडकले आहेत. अरूण हे एका आयटी बँकेत काम करतात. खूप तणावात असल्यामुळे त्यांना अचानक झोप लागली. ही त्यांची खूप मोठी चूक झाल्याचं अरूण म्हणाले. अरूण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते घटस्फोट घेण्यासाठी भारतात येत होते.
अरूण यांना त्यांच्या पत्नीकडून घटस्फोट हवा आहे. यासंबंधी याचिका दाखल करण्यासाठी भारतात येत होते. पण त्यांना झोप लागली आणि शेवटचं उड्डाण निघून गेलं. सुरुवातीला त्यांना इमिग्रेशन हॉलमध्ये परत जाण्याची परवानगी दिली गेली. मात्र तेव्हा प्रवेश केवळ जीसीसी (आखात सहकार्य परिषद) रहिवाशांसाठी होता अशी माहिती अरूण यांनी माध्यमांना दिली आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours