रत्नागिरी : आंबेनळी घाटात बस कोसळून 30 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता आंबोली घाटात 200 फूट खोल दरीत कोसळलाय. या ट्रकचा चक्काचूर झालाय. या ट्रकमध्ये किती जण होते याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. घटनास्थळी आंबोलीमधील ट्रेकर्स तरुणांची रेस्क्यू टीम पोहोचलीये.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सावंतवाडीहून कोल्हापूरकडे हा ट्रक रवाना झाला होता. या ट्रकमध्ये काही सामान नव्हतं. आंबोली धबधब्यापासून दोनशे मीटर अंतरावर खड्डा चुकवताना कठडा तोडून हा ट्रक खाली दोनशे फूट दरीत कोसळला असावा असं पोलीस सुत्रांचं म्हणणं आहे.
या ट्रकमध्ये नक्की किती जण होते याचा अद्याप शोध सुरू आहे. आंबोली मधल्या तरुणांची रेस्क्यू टीम आता दरीत अर्ध्यावर उतरली आहे. अंधार झाल्यामुळे बचावकार्यात अडथळा येत आहे. पण तरीही बचावकार्य सुरू आहे.
मागील महिन्यात २८ जुलैच्या सकाळी साडेदहाच्या सुमारास आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापीठाच्या बसला अपघात झाला आणि बसमधील ३0 जणांचा मृत्यू झाला. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेत प्रकाश सावंत देसाई नावाचे एक कृषी अधिकारी आश्चर्यकारकरित्या वाचले आणि या घटनेची माहिती सर्वांना कळवली.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours