नाशिक: विघ्नहर्ता म्हणून ओळख असलेल्या गणपती बाप्पाचा गणेशोत्सव नाशिकमध्ये संकटात सापडला आहे, कारणं महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या एका निर्णयानंतर नाशिकमधील काही महत्वाच्या सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे आणि या मंडळांना शहरातील इतरही गणेश मंडळांनी पाठिंबा दिल्याने नाशिकमध्ये यंदा गणेशोत्सव साजरा होतो की नाही या संदर्भात साशंकता निर्माण झाली आहे.
नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेलं भालेकर मैदानावरील सार्वजनिक गणेशोत्सव यंदा वादात सापडला आहे. गेल्या 35 ते 40 वर्षांपासून या मैदानावर शहरातील 9 ते 10 महत्वाचे सार्वजनिक गणेश मंडळ गणपती बाप्पाची प्रतिष्ठापणा करतात. मात्र ह्या वर्षी ह्या जागेवर स्मार्ट सिटी अंतर्गत पार्किंगसाठी काम सुरू असल्याने,हे मैदान गणेशोत्सवासाठी देता येणार नाही अशी भूमिका महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतली आहे.
ही ऐतिहासिक जागा असून 40 वर्षांपासून आम्ही गणेशोत्सव याच जागेवर साजरा करत आहोत. त्यामुळे आम्हाला हीच जागा हवी आहे अशी भूमिका मंडळांनी घेतल्याने हा संपूर्ण वाद निर्माण झाला आहे. या जागेवर पार्किंगसाठी काम सुरू असलेतरी गणेशोत्सव आधी हे काम पूर्ण होऊ शकते.
त्यामुळे आयुक्तांनी दहा दिवसासाठी ही जागा आम्हाला द्यावी अशी मागणी मंडळांनी केली आहे. नाहीतर गणेशोत्सवावर बहिष्कार टाकण्याची भूमिका मंडळांनी घेतली अशी माहिती
संभाजी गणेश मंडळ अध्यक्षाचे गणेश बर्वे-राजे यांनी दिली.
आतापर्यंत तुकाराम मुंढे यांनी घेतलेले अनेक निर्णय वादग्रस्त ठरले आहेत, भालेकर मैदानावर गणेशोत्सवसाठी परवानगी नाकारत मुंढे यांनी पुन्हा एकदा गणेशमंडळांचा रोष ओढून घेतला आहे. शहरातील इतर गणेश मंडळ देखील या निर्णयाने आक्रमक झाले असून बहिष्कार च्या भूमिकेत आहे.
नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदाच गणेशोत्सव वादात सापडल्याने आता यावर महापौर आणि आयुक्त काय भूमिका घेतात हे बघण्यासारखं राहणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours