नागपूर: उपराजधानी नागपुरातील महापालिकेची शहर बस सेव कुठल्याही वेळी बंद पडू शकते अशी स्थिती निर्माण झाली आहे. नागपूर महानगर पालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असतांनाच मोठ्या तोट्यात असलेली नागपूर शहर बस सेवेने मनपाला आणखीनच तोट्यात आणले आहे. 'जीएसटी'सह बिलाच्या मुद्यावर ग्रीन बस ऑपरेटर 'स्कॅनिया'ने आठवड्याभरापुर्वीच आपली सेवा बंद केली. आता शहर बसच्या (रेड बसच्या) तीन आँपरेटरलाही नियमित बिले देण्यास मनपा असमर्थ ठरली आहे. या बस चालविणाऱ्या तीन्ही ऑपरेटरचे एकूण ४२ कोटी रुपये थकीत असून, यापैकी केवळ ७.५० कोटी रुपयांचे बिलच अदा करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत 'रेड बस'ची चाके कुठल्याही क्षणाला थांबतील अशी स्थिती निर्माण झाली आहे.
केंद्रीय दळणवळण मंत्री आणि नागपुरचे खासदार नितीन गडकरी यांनी गेल्या आठवड्यातच मनपात बैठक घेऊन वाहतूक सेवेसह शहराशी संबंधित अनेक मुद्यांवर चर्चा केली. या बैठकीत ग्रीन बससेवा सुरू ठेवण्याबाबत स्वीडनच्या 'स्कॅनिया' कंपनीच्या प्रतिनिधींशी त्यांचे बोलणेही झाले. मात्र, त्यावर कुठलाच तोडगा न निघाल्याने १३ आँगस्टपासून शहरातली ग्रीन बससेवा बंद झाली.
या बैठकीत गडकरींनी याच विषयावर २३ आँगस्टला नवी दिल्लीत बैठक आयोजित करण्याची घोषणाही केली होती. शहरात तीन रेड बस ऑपरेटर असून, त्यांचे जुलै-20185 पर्यंतचे प्रत्येकी १४ कोटी रुपये थकीत आहेत. पैसे न मिळाल्यामुळे तिन्ही ऑपरेटरनी बससेवा एक दिवस बंदही ठेवली होती. त्यानंतर मनपा प्रशासनाने तातडीने ऑपरेटरला प्रत्येकी २.५० कोटी रुपये अदा केले होते. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बैठकीत तिकिटांपासून मिळणारं उत्पन्न ऑपरेटरलाच देण्याचे निर्देश मनपाला दिले होते, पण त्यावरही अद्याप निर्णय झाला नसल्याने तिढा कायम आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours