जिल्हा संपादक शमीम आकबानी क्राईम रिपाेर्टर संदीप क्षीरसागर

बातमी आहे लाखनी तालुक्यातील पिंपळगाव/सडक ची जिथं संपुर्ण गावकऱ्यांना आपली मागणी पुर्ण करन्याकरिता रास्ता राेकाे अश्या आंदाेलनाची गरज पडली आहे । पिंपळगाव सडक ता.लाखनी जिल्हा भंडारा हा ठिकान मुख्य बाजार पेठेच्या ठिकान असुन या गावासाेबत आजुबाजुच्या छाेट्या माेठ्या २०(विस) गावांचा समावेश आहे.आजुबाजुच्या सर्व गावातील विद्यार्थी-विद्यार्थींनी साेबत सर्व नागरिकांना ,वृद्धांना पिंपळगाव सडक या ठिकानावरुन जाणे-येणे करावे लागते .मुख्य बाब म्हणजे या गावात प्रवासी निवारा नसुन मुख्य म्हणजे या गावाला येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक जनता व सुपर फॉस्ट बसेस थांबत नाही .


त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेच्याअभावी शैक्षणिक नुकसान हाेताे व जाेडलेल्या आजुबाजुच्या सर्व गावांच्या नागरिकांना फार माेठा मानसिक त्रास सहन करावा लागताे.आणि वारंवार तक्रार करुनही महामंडळाचे अधिकारी यांनी  काेणत्याही प्रकारचे पाऊल आजपर्यंन्त ऊचलेले नाही म्हणुन सर्व गावांच्या नागरिकांना मधे तिव्र आक्राेश पसरलेला असुन पिंपळगाव सडक ग्रामपंचायत व समस्त ग्रामवासियां तर्फे दि.२०-८-२०१८ राेजी ग्रामसभेचा ठराव सर्व ग्रामवासिंया तर्फे घेण्यात आला असुन दि.२८-८-२०१८ ला मुख्य राेड हनुमान मंदिर समाेर सकाळी ९ वाजता तिव्र आंदाेलन करन्यात येईल तरी या आंदाेलनात काही अनपेक्षित किंवा नुकसान झाल्यास राज्य परिवहन महामंडळ भंडारा जिम्मेदार राहणार असे त्यांनी या वेळेस कळविले आहे
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours