पालघर, 10 ऑगस्ट : पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पश्चिमेकडील भंडारआळी परिसरात एका बंगल्यात एटीएसच्या पथकाने छापा मारला आहे. यात संशयित आरोपी वैभव राऊतला एटीएसने ताब्यात घेतलंय. त्याला घेऊन पथक मुंबईला रवाना झालीये. त्याला  कोर्टात हजर करणार आहेत. छापा टाकलेल्या बंगल्यात काही घातक सामुग्री असल्याचा सुगावा लागला होता. त्यानुसार एटीएस काही दिवसापासून नजर ठेवून होती. आणि त्यानंतर याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी छापा टाकला आहे.

संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या वैभव राऊत याच्याबद्द अद्याप कोणतीही मीहिती समोर आलेली नाही. पण त्याच्यासोबत आणखी 2-3 जण काम करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलीस आता वेगळ्या पद्धतीने कारवाई करण्यार आहे. काही ठराविक लोक 2-3 दिवसांनंतर वैभवच्या संपर्कात यायची त्यामुळे पोलीस चौकशीत काही महत्त्वाची माहिती मिळण्याची आवश्यकता आहे. पण या सगळ्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पाऊलं उचलण्यात आली आहे.
या बंगल्यातली घातक सामुग्री शोधण्यासाठी श्वानपथक  बॉम्ब शोध आणि नाशपथक मागवण्यात आलं आहे. वजन काटा, काही पिशव्यांमध्ये सामान आढळून आलंय. परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आजूबाजूच्या परिसरात शोध मोहीम घेतली असता वजन काटा, काही पिशव्यांमध्ये काही सामान भरलेलं होतं. त्यामुळे ते सामान नेमकं कशाचं आहे याचा तपास घेण्यासाठी सगळ्या वस्तू फोरेंसिक तपासासाठी पाठवण्यात आलं आहे. पण दरम्यान, या सगळ्यामुळे आसपासच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours