नागपूर जिल्ह्यातील भिवापूर जवळच्या वेस्टर्न कोल फिल्डच्या खाणीत लघुशंकेसाठी गेलेल्या २४ वर्षांच्या तरुणीवर चार नराधमांनी बलात्कार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सध्या नागपूरात रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून, या निर्भयाची रुग्णालयात जगण्यासाठी झुंज सुरु आहे. नागपुरात नराधमांनी तिची अगतिकताही ओरबाडली या विचारानेच नागपूरकर भडकले आहेत. केंद्र सरकारच्या कार्यालयात काम करणाऱ्या महिलांसाठी साधं शौचालयही नसल्यानं हा अनर्थ घडल्याचा आरोप पीडितेच्या आईनं केला आहे. या प्रकरणात माम्लेश चक्रवर्ती आणि संतोश माळी या ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना अटक कऱण्यात आली असून अजून दोघांचा शोध पोलीस घेत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours