मुंबई, २४ ऑगस्ट- खर्डी स्थानकात भुसावळ पुणे एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतुक खोळंबली. कसारावरून मुंबईला येणाऱ्या प्रवासांना याचा फटका बसला आहे. कसारावरून येणारी रेल्वे वाहतूक ठप्प असून टिटवाळा ते मुंबईच्या गाड्या १० ते १५ मिनिटं उशीराने धावत आहेत. कसारा ते आसनगाव रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेसेवा ठप्प झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours