मुख्य सपादिका-  सुनिता परदेशी
भंडारा- संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना भंडारा जिल्ह्यात वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील आरक्षणासह विविध मागण्यांसाठी ओबीसी संघटनांनी मोर्चेबांधणी केली आहे. याच अनुषंगाने शनिवारी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत रत्न व घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून एक दिवसीय धरणे आंदोलनाला सुरवात करण्यात आले व   त्यानंतर मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. अन्याय निवारण संघर्ष समितीच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.


राज्यात ओबीसी नागरिकांची संख्या मोठी आहे. परंतु, या समाजाला केवळ २७ टक्के आरक्षण लागू केलेले आहे. गेल्या काही वर्षात ओबीसी समाजाला आरक्षण, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळत नाही. पात्रता असूनही शासकीय नोकरी मिळत नाही. या प्रकारामुळे ओबीसी समाजात असंतोष निर्माण झाला आहे. या अन्यायाच्या विरोधात ओबीसी समाजाच्या संघटनांनी प्रशासन व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.


ओबीसी प्रवर्गात अनेक नवीन जाती समाविष्ट करून ओबीसींची संख्या वाढविली. परंतु, आरक्षणाची मर्यादा वाढविण्याऐवजी २७ टक्के वरून १९ टक्के आणली. प्रत्यक्षात तेवढेही आरक्षण दिले जात नाही. नव्या प्रगत जाती ओबीसींमध्ये समाविष्ट करून ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा खेळ सुरू आहे. ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, वैद्यकीय प्रवेश प्रक्रि येमध्ये ओबीसी प्रवर्गाला २७ टक्केपैकी १.९ टक्के इतके आरक्षण दिले आहे. ते आरक्षण २७ टक्के दिले जावे. नवोदय विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेत ओबीसींना आरक्षण नाही. ते २७ टक्के आरक्षण देण्यात यावे. ओबीसी समूहातील सर्व जातींची क्रि मीलिअरची अट रद्द करण्यात यावी. ओबीसी कर्मचाऱ्याना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय स्वतंत्र वसतीगृह सुरू करावे. ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती द्यावी. शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या. शेतकºयांना शंभर टक्के अनुदान द्यावे. राष्ट्रीय इतर मागासवर्गिय आयोगाला संवैधानिक दर्जा मिळावा. ओबीसी स्वतंत्र मतदार संघ स्थापन करावा. ६० वर्षे वयोगटावरील शेतकरी, मजूर व कामगारांना पेंशन लागू करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.  यावेळी सरकारकडून ओबीसींवर कसा अन्याय केला जात आहे, याबाबत उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.आंदोलनानंतर संध्याकाळच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या धरणे आंदोलनात खासदार मधुभाऊ कुकडे  सदानंद इलमे, पांडुरंग फुंडे, मुरलीधर भर्रे,माजी आमदार ऍड आनंदराव वंजारी, भय्याजी लांबट, गोपाल सेलोकर, गोपाल देशमुख, उमेश सिंगनजुडे, रमेश शहारे, प्रभू मने, शालिकराम कुकडे, सूर्यकांत इलमे, माजी मंत्री नाना पंचबुद्धे , मनोज बोरकर, मंगला डहाके, रोशनी पडोळे, नेपाल चिचमलकर, दुर्याेधन अतकारी, धनराज झंझाड, महेश कुथे, केशव बांते, मधुकर चौधरी, गणराज दोनाडकर,राकेश आंबोने, भाऊराव सार्वे, माधवराव फसाटे, जयश्री बोरकर, उर्मिला आगाशे, वनिता कुथे, सुभाष आजबले, संजय एकापूरे, धनराज साठवणे, दिनेश गिहरेपुंजे,के.झेड. शेंडे, पांडुरंग खाटीक,महेंद्र गटकरी, आशु गोंडाने, शिवेश कडवं, जयंत बोटकुले, नरेश बंदरे, राजकुमार मटे, बालू ठवुकर , प्रमोद मानापुरे,नितीन तुमाणे, आदी समाजबांधव उपस्थित होते.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours