अड्याळ ग्रामपचायतनी घेतली दखल◆
●दणका अड्याळ विकास मंच गृप चा●
अड्याळ:- अड्याळ झोपडपट्टि वसाहतीमध्ये शासकिय भुखंडावर अतिक्रमण वाढल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे सदर प्रकरण अड्याळ विकास मंच गृप चे  सदस्यांनी ग्रा.पं. च्या लक्षात आणून देताच सरपंचा जयश्री कुंभलकर व ग्रा.पं. सदस्य यांनी मोक्यावर जावून चौकशी केली व अतिक्रमणधारकांना नोटिस देऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
       पवनी तालुक्यातील अड्याळ हि सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे येथील व्याप हि मोठा आहे मात्र वार्ड क्रं.६ झोपडपट्टी वसाहतीकडे ग्रामपंचायतचे संपूर्ण दुर्लक्ष असल्याने खाली भूखंडावर अतिक्रमण केले आहे. सदर समस्यावर अड्याळ विकास मंच वाँटसप गृप चे सदस्यांनी समस्या निर्दशनात आणून देताच तात्काळ सरपंचा जयश्री कुंभलकर ग्रामपंचायत सदस्यासह पोहचून अतिक्रमण हटविण्याची तंबी दिली.अन्यथा नोटिस बजावून करवाहि करण्याचे वार्ड वासीयांना आश्वासन दिले.
     यावेळी ग्रा.पं. सदस्य मनोहर मोहुर्ले,कृतिका डोंगरे,रोजगार सेवक बोकडे,मुनिर शेख ,मोहन हरडे,प्रकाश हातेल, चिंतामन वाघमारे,राहुल खोब्रागडे,परिक्षित चौधरी आदी उपस्थित होते.
――――――――――――
 शहरात वाढलेले अतिक्रमण कारवाई ची वाटन बघता स्व:हुन काढा व गाव विकासाला ग्रामस्थानी सहकार्य करा.जी समस्या आमच्या लक्षात नाहि आली ती समस्या ग्रा.पं.ला सांगा आम्ही समस्या मार्गी लावू.
        जयश्री कुंभलकर
     सरपंचा ग्रा.पं. अड्याळ


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours