जिल्हा संपादक शमीम आकबानी, क्राईम रिपाेर्टर संदीप क्षीरसागर TV9PLUSNEWS लाखनी

स्वातंत्रानंतर भारतीय मुस्लिम समाज सामाजिक,शैक्षणिक आणी आर्थिक अधाेगती हाच समाज सर्वच क्षेत्रात मागे राहिला आणि आज या समाजाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.न्यायमुर्ती राजेंद्र सच्चर कमेटी,न्यायमुर्ती रंगनाथ मिश्रा कमिशन तसेच महाराष्ट्र सरकारतर्फे नियुक्त केले गेलेले मेहमूर्दरहेमान अभ्यास गटाने मुस्लिम समाजाच्या सामाजिक ,शैक्षणिक व आर्थिक हालाखीच्या स्थिती देशापुढे ऐरणीवर आणली.त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची आवश्यकता आपल्या अहवालात नमूद केली .त्यांचा शिफारशींची महाराष्ट्र सरकारने दखल घेत मराठा समाजाची १६% व मुस्लिम समाजासाठी ५%आरक्षणाचे काढून सरकारी नाेकरी व शैक्षणिक संस्थांमधे आरक्षण दिले. सदर आरक्षण मा.उच्च न्यायालय,मुंबई येथे अपील केले गेले.कायद्याचा सर्व कसाेट्यांवर मा.उच्च न्यायालयाने अभ्यास करुन मुस्लिम समाजासाठी ५%दिलेले आरक्षण शैक्षणिक संस्थांमधे वैध ठरविले हाेते.परंतु मुस्लिम आरक्षण संदर्भात अध्यादेशाची कालमर्यादा संपुन गेल्यानंतर महाराष्ट्र शासनाने याबाबत कुठलेही ठाेस पावले न उचलल्यामुळे आरक्षण रद्दबातल ठरले.मराठा आरक्षणासंबंधी राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने शासनाकडुन जाेरदार वक्तव्ये व हालचाली सुरु आहेत परंतु नैसर्गिक न्यायाने शासनाकडुन काेणतीही कृती हाेतांना दिसत नाही.याबाबत आपल्या सरकारकडुन स्पष्ट भुमिका स्पष्ट हाेत नाही .आपण राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने सर्व समाजासाठी समान संधी,समान न्याय व वाटा देणे हे आपले घटनात्मक कर्तव्य आहे.असे असताना आपन अत्यंत संवेदनशील असलेल्या मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावर चालढकल करीत आहात असे वाटते.
सदर निवेदनाद्वारे पुन:श्च एकदा विनंतीपुर्वक लक्ष वेधू इच्छिताे की,शिक्षणापासुन वंचित पिढ्या-पिढ्या न्याय हक्क नाकारलेल्या मुस्लिम समाजास त्यांचे न्याय व हक्क त्वरित मिळवुन देण्यासाठी मुस्लिमांच्या ५% आरक्षण देण्याविषयी त्वरित पावले उचलावीत.अन्यथा महाराष्ट्र राज्यात नाईलाजास्तव घटनात्मक शांततापुर्ण मार्गाने जमीयत उलेमा हिंद ला तिव्र आंदाेलन करावे लागेल असा इशारा या निवेदनाद्वारे आम्ही शासन व प्रशासनास देत आहाेत निवेदन लाखनी तहसीलदार मलीक विरानी यांच्या मार्फत आज दिले आहे निवेदन देतांना लाखनी चे परवेज आकबानी, सलीम पटेल,मुश्ताक सिद्दीकी,अमीन बकाली,शमीम आकबानी,इस्माइल आकबानी, सुरखाप सिद्दीकी, सलीम मिर्झा,अंसार लध्धानी, जावेद लध्धानी हे प्रामुख्याने उपस्थित हाेते





Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours