औरंगाबाद:  फ्रेंजशिप डे. मैत्रीचा दिवस. मैत्री कुठे आणि कशी होईल याचा अंदाज बांधता येत नाही. कधीही कुणशीही होईल हेही सांगता येत नाही. औरंगाबादेत दोन मित्रांच्या मैत्रीचा धागा जुळला तो सुरांमुळे. या दोघांच्याही मैत्रीचं नातं आता सातव्या सुरात पोहचला आहे.

सुरांमुळे मैत्रीचा धागा जोडणाऱ्या औरंगाबादेतील दोन मित्रांचा संगीत हाच त्यांच्या दोघांमधला दुवा ठरलयं. संगीतानंचं याची मैत्री घडली. आणि तीस वर्षानंतरही ती शाबुत आहे याचं कारणंही संगीत आहे. दोघेही एकमेकांच्या साथीने जीवनाचा आनंद गाणारे. प्रभाकर सुभेदार आणि प्रकाश गायकवाड यांची ही मैत्री जणु होणारच होती. प्रकाश असल्याशिवाय प्रभा म्हणजेच सकाळ होत नाही. आणि प्रभा म्हटलं की प्रकाश हा हवाचं. दोघेही सेवानिवृत्त, आपल्या कर्तव्यातुन मोकळे झालेले. अशावेळेला एकमेकांना साथ यांच्या मैत्रीचीच. आणि बरं गाणं कसंही असो, यांचा सुर कसाही लागो, पण यांची मैत्री म्हणजे सातस्वरांनी गुंफलेलं एक संदर, सुरमयी असं गाणंच.
'फ्रेंडशीप डे'चं महत्त्व फक्त हातावर फ्रेंडशीप-बँड बांधण्यापुरतं मर्यादित न ठेवता, सुरांच्या साथीनं आपली मैत्री जीवंत ठेवण्याचा एक अनोखा पण औरंगाबादेतल्या या दोन संगीतप्रेमिंनी घेतलाय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours