मुंबई, 09 ऑगस्ट : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक आणि धुळे या शहरांमध्ये बंद पुकारण्यात आलेला नाही. पण मुंबईच्या वांद्रे भागात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राज्यव्यापी बंद आंदोलन करण्यात येणार आहे. पण दरम्यान शाळा बंद ठेवायच्या की नाही, निर्णय मुख्याध्यापकांचा असंही मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं आहे. तर नवी मुंबई एपीएमसीमधून भाजीपाल्याची आवक आज बंद असणार आहे. अहमदनगर, हिंगोली, सोलापूर, वाशिम, परभणी, सातारा, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, जालना, अकोल्यामध्ये बंद ठेवण्यात आला आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राज्यव्यापी बंद आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
Home
जनसमस्या
महाराष्ट्र
मुंबई
Maharashtra Band LIVE : बार्शी तालुक्यातील इंटरनेट सेवा पुर्णपणे ठप्प
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours