मुंबई, 09 ऑगस्ट : शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच पार्थिव अंत्यसंस्कार विधीसाठी त्यांच्या घारातून रवाणा झालं आहे. काही वेळात मेजर राणेंच्या पार्थिवावर मीरा-रोडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतील. सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत पार्थिव घरी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर 9 ते 10.30 वाजेपर्यंत श्रद्धांजली वाहण्यात आली आणि 10.30 नंतर नजीकच्या वैकुंठधामात अंत्यविधी पार पडणार आहे. जम्मू-काश्मिरात दहशतवाद्यांशी लढतांना देशासाठी धारातीर्थी पडलेल्या शहीद कौस्तुभ राणेंचं पार्थिव काल मुंबईत पोहोचलं. मुंबई विमानतळावर त्यांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली. त्याआधी नवी दिल्लीत लष्करी मुख्यालयात मेजर राणेंच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहण्यात आली. मंगळवारी जम्मू-काश्मिरात दहशतवाद्यांशी लढताना 4 जवान धारातीर्थी पडलेत. तर 2 दहशतवाद्यांचा यावेळी खात्मा करण्यात आला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours