मुंबई: मुंबई आणि ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच मुंबई आणि ठाण्यात 121 गोविंदा जखमी झाले. तर कुश खंदारे या गोविंदाचा मृत्यू झाला. विविध गोविंदा पथकांनी थर लावून हंडी फोडण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांमध्ये आत्तापर्यंत 121 गोविंदा जखमी झालेत. या सर्व गोविंदांवर विविध हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू आहेत. काही गोविदांना उपचारानंतर घरी जाण्याची परवानगी देण्यात आलीय. तर अनेक गोविंदा विविध हॉस्पिटल्समध्ये भरती असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

या हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत उपचार

सायन हॉस्पिटल,  केईम हॉस्पिटल, नायर, एस.एल.रहेजा-, पोद्दार, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, एम.टी. अग्रवाल, राजावाडी, महात्मा फुले, व्ही.एन. देसाई, भाभा हॉस्पिटल, तर ट्रॉमॉ केअरमध्ये असलेल्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

पोलीस आणि प्रशासनाने सर्व गोविंदा पथकांना काळजीपूर्वक खेळण्याचं आवाहन केलंय. थोडी काळजी घेतली तर आनंदावर विरजण पडणार नाही आणि उत्तमपणे खेळही खेळता येईल.

या आधीच सुप्रीम कोर्टानं उंच थर लावण्याला चाप लावल्याने आता फार उंच थर लावता येत नाहीत. त्यामुळेही मोठं अपघात टळणार आहेत. गोविंदा पथकं, आयोजक आणि प्रत्यक्ष खेळणाऱ्या गोविंदांनी काळजी घेतली तर या खेळाचा आनंद वाढू शकतो असं पोलिसांनी म्हटलं आहे.

कुश खंदारेचा मृत्यू

पहिल्या थरावरून पडल्याने धारावितल्या एका गोविंदाचा मृत्यू झाला. कुश खंदारे असं या गोविंदाचं नाव असून तो धारावी बाल गोपाळ मित्रमंडळ गोविंदा पथकातला सदस्य होता. 27 वर्षांचा कुश या मंडळाचा सक्रिय सदस्य होता. त्याच्यामागे त्याची आई आणि जुळा भाऊ आहे. अंकुशच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटूंबावर दु:खाची कुऱ्हाड कोसळलीय.

कुश पहिल्या थरावर असतानाच थरासोबतच खाली कोसळला. तेव्हा त्याला फिटही आली. त्याच अवस्थेत त्याला सायन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. कुश हा एका खासगी कंपनीत नोकरीला होता. कुशच्या मृत्यूमुळे दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागलंय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours