मुंबई, 2 सप्टेबर : कुलाब्यातून शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर घरी न परतलेल्या पाच शाळकरी मुली कुलाबा पोलिसांना शनिवारी कुर्ला रेल्वे स्थानकावर सापडल्या. कफ परेडच्या एका पोलीस कॉन्स्टेबल त्याच्या नातेवाईकासोबत जात असताना त्याला भटकत असलेल्या या मुली दिसल्या होत्या आणि त्याच आधारे पोलिसांनी या हरवलेल्या पाच मुलींना शोधून काढले आहे,
कालपासून बेपत्ता असलेल्या या मुलींनी टॅक्सी आणि रेल्वेने प्रवास करत शाळेतून सुटल्यानंतर मारिन लाइन्स ते हँगिंग गार्डन आणि नंतर दादर ते ठाणे आणि ठाणे ते दादर असा प्रवास केल्याचे तपासात उघड झाले आहे. पुन्हा आज या मुली कुर्ला रेल्वे स्थानकावर पोलिसांना शोध घेत असताना सापडल्या. कमी गुण मिळाल्यानं या मुली घराबाहेर पडल्या की आणखी कुठल्या कारणाने याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत. पाचही विद्यार्थिनींना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात आलंय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours